7 जुलै म्हणजे धोनीचा वाढदिवस. सचिन नंतर संपूर्ण भारतात "सर्वात लोकप्रिय खेळाडू कोण?" असं विचारलं तर तो म्हणजे धोनी! बॅटिंगला येताना प्रेक्षकांकडून त्याला जो चियर मिळतो तो याची साक्ष देतो. या सर्व चाहत्यांच्या गर्दितला मी पण एक सामान्य चाहता, म्हणून हा लेखप्रपंच! तर धोनी म्हणजे क्रिकेटला मिळालेल्या परिपूर्ण खेळाडूंंपैकी एक. एक परफेक्ट फलंदाज, परफेक्ट यष्टिरक्षक, परफेक्ट कर्णधार म्हणजेच तो एक परिपूर्ण खेळाडू आहे!
धोनी एक फिनिशर म्हणून
फिनिशर म्हणून ओळख मिळवणारा कदाचित तो पहिला भारतीय फलंदाज असेल. त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा ऑस्ट्रेलियन डावखुरा फलंदाज मायकल बेवन याला 'बेस्ट फिनिशर' म्हणून ओळखायचे. रिकी पॉन्टिंग "ग्रेटेस्ट" कॅप्टन होण्यामागे सर्वात महत्वाचा वाटा त्याच्या "परफेक्ट" असलेल्या टीम चा होता. बेवन हा त्या परफेक्ट टीम चा परफेक्ट फिनिशर होता. कित्येक हारलेले सामने त्याने जिंकवलेले आहेत. भारताकडे त्या वेळी असा कुणीच फलंदाज नव्हता. दोन चार अपवाद वगळता भारत बहुतेक वेळेस चेसिंग मध्ये नांगी टाकायचा. धोनी आणि बेवन स्टेटिस्टिक्स च्या बाबतीत सारखे असतील, किंवा धोनी थोडा पुढे असेल. शून्यातून निर्माण केलेलं अस्तित्व जास्त मोठं असतं, त्याची धग सतत जाणवत राहते. 'टॉप ऑर्डर अपयशी झाली की आपण हारतो' भारतीय फँस च्या या समजुतीला चूकवत धोनीने "फिनिशर" म्हणून त्याचं अस्तित्व निर्माण केलं ! २००९-१० मध्ये धोनी त्याच्या करियरच्या पिक ला होता. जवळजवळ एक वर्ष तो ICC rankings मध्ये अव्वल होता. ५ किंवा ६ नंबर येऊन वर्षभर अव्वल स्थानी फिनिश करणे हे धोनीच करू शकतो. म्हणूनच तो "बेस्ट फिनिशर" आहे !
धोनी एक कर्णधार म्हणून
कुठलेही कार्यक्षेत्र पहा, एक गोष्ट तुम्हाला जाणवेल जी मला जाणवली. क्षेत्र व्यावसायिक असो, वैद्यकीय असो, राजकीय असो,क्रीडा असो वा संरक्षण असो, या सर्व क्षेत्रांत जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तिंची निर्णयक्षमता त्यांच्या कामाचा दर्जा ठरवते. मोदी सरकारचे यश कशात आहे तर एखादा नक्कीच सांगू शकतो, त्यांच्या निर्णयक्षमते मध्ये आहे म्हणून!घेतलेल्या निर्णयाचे परिणाम चांगले की वाईट हा वेगळा विषय असतो किंवा बऱ्याच अंशी अमंलबजावणीवर अवलंबून असतो. आता क्रिकेट हा खेळच पहा, प्रत्येक क्षणी खेळाडूच्या निर्णयक्षमतेची चाचणी इथे होत असते. गोलंदाजाने कोणत्या फलंदाजाला कश्या प्रकारचा चेंडू टाकावा, फलंदाजाने कोणत्या चेंडुवर कसा शॉट मारवा, क्षेत्ररक्षण कसे रचावे यापासून ते थेट कर्णधाराने कोणाला गोलंदाची द्यावी आणि कोणत्या फलंदाजाला क्रमवारीत वर पाठवावे यापर्यंत सर्वच ठिकाणी निर्णयक्षमतेची परीक्षा होते. वेळेची मर्यादा असल्यामुळे निर्णय फटकन घ्यायचा असतो त्यातल्या त्यात चांगल्या परिणामांची अपेक्षा करून. ईतर कुठल्याही सांघिक खेळापेक्षा क्रिकेट मध्ये कर्णधाराचे महत्त्व जास्ती असते.फक्त टॉस जिंकण्या आणि हरण्यापुरते त्याचे काम मर्यादित नसते.म्हणूनच त्याच्या निर्णयाला महत्त्व असते आणि संघ जिंकला किंवा हरला तर त्याचे श्रेय किंवा शिव्या नेहमीच कर्णधाराला खाव्या लागतात. म्हणून कित्तेक कर्णधार तुम्हाला धाडसी निर्णय घेताना दिसत नाहीत. या गर्दीत धाडसी निर्णय घेताना न बिचकणारा आणि प्रतिकुल inputs मधून अनुकूल output काढणारा कर्णधार कोण हे नव्याने सांगायला नको!पहिल्या वहिल्या T20 विश्वचषकाच्या फायनल ला जोगिंदर शर्मासारख्या नवख्या गोलंदाजाला अंतिम षटक टाकायला सांगणे,विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत स्वतः वर येउन सामना जिंकवून देण्यापासून ते ३८ व्या षटकात नऊ विकेट्स गेलेल्या असताना इशांत शर्माला बरोबरिला घेउन शेवटच्या षटकात ४ चेंडूंत १५ धावा करण्यापर्यंत धोनीची निर्णयक्षमता कमालीची आणि फक्त कमालीची आहे!त्याचे आयुष्यातले निर्णयही असेच आहेत धाडसी, मग तो टेस्ट मधून घेतलेला संन्यास असो वा वनडे चे सोडलेले कर्णधारपद असो! धोनी सारखा ग्रेट कर्णधार ग्रेट ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंग सारखा नाही, किंबहुना तो नाहीच, कारण तो एम एस धोनी आहे,कैप्टेन कूल एम एस धोनी !
धोनी एक यष्टिरक्षक म्हणून
मला जेव्हा क्रिकेट समजायला लागले तेव्हा एडम गिलक्रिस्ट हा दिग्गज सर्वात चांगला यष्टिरक्षक फलंदाज होता. तडाखेबाज फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्य होते. हेडन सोबतच्या त्याच्या काही अफलातून इनिंग्स कोण विसरेल? साउथ आफ्रिकेचा मार्क बाउचर हा सुद्धा एक चांगला यष्टिरक्षक फलंदाज होताच! आणि तब्बल 11 वेळेस द्विशतक केलेला कुमार संगकारा याला विसरून कसं चालेल? या सर्वच मातब्बर खेळाडूंंना मागे सारून धोनी "बेस्ट विकेटकिपर बैट्समन" झाला. कसोटीतील त्याची कामगिरी चर्चेचा विषय आहे, पण वनडेतील त्याच्या कामगिरीवार शंका उपस्तिथ करणे म्हणजे मूर्खपणाच ठरेल! यष्टिरक्षणात त्याच्या स्किल्स मुळे तर तो भावच खाऊन जातो. न बघता उलट्या दिशेने चेंडू फेकून पायचित करणे, कमालीच्या वेगाने स्टंपिंग करणे या त्याने निर्माण केलेल्या कला आहेत! 2013 च्या चैंपियन्स ट्रॉफी ची फाइनल आठवते का तुम्हला? त्यात धोनीने केलेला बेल चा स्टंपिंग त्या सामन्याचा टर्निंग पॉइंट होता! बेलला स्वप्नातही वाटले नसेल की कुणी इतक्या वेगाने स्टंपिंग करु शकते म्हणून.
तर अशाप्रकारे धोनी क्रिकेटला मिळालेला एक परिपूर्ण खेळाडू आहे. तो आता 37 वर्षांचा झालाय. कुठल्याही खेळाडूसाठी ही निवृत्तिची वेळ असते. शरीर साथ देत नसते. मात्र या वयातही धोनी जगातल्या फिटेस्ट खेळाडूंंपैकी एक आहे. त्याची पळून धावा काढण्याची क्षमता जबरदस्त आहे. त्याच्या या "Running between the wickets" चा खुद्द गावस्कर चाहता आहे! त्यामुळे तो अजुन भरपूर खेळो आणि भारताला भरपूर सामने जिंकुन देवो हीच इच्छा!!!
तर अशाप्रकारे धोनी क्रिकेटला मिळालेला एक परिपूर्ण खेळाडू आहे. तो आता 37 वर्षांचा झालाय. कुठल्याही खेळाडूसाठी ही निवृत्तिची वेळ असते. शरीर साथ देत नसते. मात्र या वयातही धोनी जगातल्या फिटेस्ट खेळाडूंंपैकी एक आहे. त्याची पळून धावा काढण्याची क्षमता जबरदस्त आहे. त्याच्या या "Running between the wickets" चा खुद्द गावस्कर चाहता आहे! त्यामुळे तो अजुन भरपूर खेळो आणि भारताला भरपूर सामने जिंकुन देवो हीच इच्छा!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा