मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

जोकर....

अलीकडील पोस्ट

राजकीय इकोसिस्टम...

 सध्या फेसबुकवर राजकीय/वैचारिक इकोसिस्टम विषयी चर्चा चालू आहे. महाराष्ट्रातील मातब्बर राजकारणी श्री शरद पवार यांची इकोसिस्टम किती प्रभावी आहे आणि सत्ता असो वा नसो ते त्या यंत्रणेचा कसा फायदा करून घेतात आणि हिंदुत्ववादी भाजपला अशी राजकीय सामाजिक वैचारिक इकोसिस्टम का उभी करता आली नाही अशा आशयाची ही चर्चा आहे.  "अशा इकोसिस्टमची गरजच काय?" "RSS ची यंत्रणा आहे ना!" "...मग पवार साहेबांचे 4 च खाजदार का निवडून येतात?" ... अशा प्रकारचे मतप्रदर्शन काही भाजप समर्थकांनी केले. खरंतर या विषयावर बोलताना आपल्याला हे समजून घेता आले पाहिजे की ही यंत्रणा 'वैचारिक' आहे. इथे एकाच विचाराचे पत्रकार, लेखक, विचारवंत, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र आले आहेत. आणि तो विचार 'डावा' आहे हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात या यंत्रणेला आपण लेफ्ट इकोसिस्टम म्हंटल तरी हरकत नसावी.  शरद पवार हे या इकोसिस्टमचा एक भाग आहेत. हे मान्यच की महाराष्ट्रात ही यंत्रणा उभी करण्यात त्यांचं योगदान आहे. पण काँग्रेस सुद्धा त्याच विचारांची असल्यामुळे आणि पर्यायाने ती

भारतीय प्रसारमाध्यमे : एक निरीक्षण

2014 च्या लोकसभा निवडणुकांनी भारतीय राजकारण कायमचेच बदलून टाकले. एक विचारसरणीकडून राजकीय दृष्ट्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या गोष्टी मुख्य प्रावाहात आल्या. सेक्युलॅरिसम् ची जागा आता नॅशनॅलिसम् ने घेतली आहे. 'वोट बँकेचे' राजकारण हळूहळू लोप पावत चालले आहे. याबरोबर आणखीन बऱ्याच गोष्टी बदलल्या. मग लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला म्हणतात तो मीडिया बदलणार नाही कशावरून? 2014 नंतर देशातील मीडियाचे सरळ दोन गटच तयार झाले. एका गटाने उजवा हात पकडला तर दुसरा गट जो आधीच डावीकडे होता, असे मीडियाचे विभाजन झाले. पण आजही सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांवर वर्चस्व आहे ते डाव्या गटाचेच. उजवा गट कधी अस्तित्वातच नव्हता असं नाही, पण मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचणे त्यांना जमले नाही. (की जमू दिले नाही?) 2014 नंतर मात्र तथाकथित 'मेनस्ट्रीम' माध्यमांमध्ये असा 'उजवा' गट तयार झाला. शिवाय सोशल मीडिया हे सर्वच विचारांच्या लोकांना खुले असल्यामुळे येथेही बरेच डावे विरोधी पत्रकार, वेब पोर्टल्स तयार झाले. यामुळे पत्रकारितेचा ठेका घेतलेल्यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार हे नक्की होते. आतापर्यंत आम

इंग्लंड वि. न्यूजिलँड (वर्ल्ड कप फायनल) : ऐतिहासिक सामना १

मी लहानपणापासूनच क्रिकेट चाहत्यांकडून सर्वोत्तम एकदिवसीय सामान्याविषयी ऐकले होते. १९९९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपची सेमिफायनल- 'ऑस्ट्रेलिया वि. साऊथ आफ्रिका' म्हणजे आतापर्यंत खेळला गेलेला सर्वांत रोमांचक सामना. त्या सामन्याच्या चर्चा आजही लोक करतात. ह्या सामन्याच्या वेळी मी लहान होतो, त्यामुळे हा सामना मी पाहिला तो त्या सामन्याचा रिपीट टेलिकास्टच. पण त्या मॅचचा रोमांच किंचितही कमी झालेला नव्हता. आजही ती मॅच लागली की मी एकटक पाहतो, इतका जबरदस्त तो मुकाबला होता. थोडक्यात काय तर हा सामना क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झालाय. (या सामन्यावर आपल्या ब्लॉगवर एक लेख सुद्धा आहे. जरूर वाचा!) पण क्रिकेट चाहता असल्यामुळे माझ्या मनात एक खंत होती असा सामना आपल्याला लाईव्ह पाहायला नाही मिळाला. परत कधी असा सामना होईल हे मला वाटलं नव्हतं, पण इच्छा नक्की होती. आणि असा सामना याची देही याची डोळा पाहायला मिळाला, आम्हा क्रिकेट चाहत्यांना जणू देवच पावला. २०१९ चे क्रिकेट विश्वचषक हे खूप गाजले. बऱ्याच दिग्गज खेळाडूंचे हे शेवटचे विश्वचषक असणार होते. इंग्लंडच्या पावसाने बरेच सामने रद्द करून क्रिकेट चाहत्या

परिवर्तनवादी डॉ बाबासाहेब आंबेडकर.

लाखों वर्षापूर्वी मानव हा प्राणी अस्तित्वात आला तेव्हापासून ते आज एकविसव्या शतकापर्यंत अनेक सामाजिक प्रवाह रुजू झाले आणि मोडीतही निघाले. मानव मुळता सामाजिक असल्याकारणाने हे साहजिक होते. हे प्रावाह रुजू होताना नेहमीच समाजात प्रबळ असलेल्या घटकांना अनुसरूनच रुजू झाले. त्यामुळेच राजकीय आणि धार्मिक प्राबल्य स्वतःकडे असणे प्रत्येक वर्गाला (एकाच विचाराच्या लोकांना) गरजेचे वाटू लागले. म्हणून मिळवलेली सत्ता आणि धार्मिक श्रेष्ठत्व टिकवणे ज्या त्या वर्गासाठी महत्वाचे होते. पृथ्वीवर खंड, भाषा, प्रांत ह्या गोष्टी विभिन्न असल्या तरी मानवाच्या "मुळ मानवीय संकल्पना" ह्या एकसारख्याच असतात. म्हणूनच मध्ययुगीन काळात युरोपात सामंतशाही, अमेरिकेत मुळ अमेरिकी लोकांवर वसाहतींचे असलेले वर्चस्व, आफ्रिकेतील वंशवाद आणि भारतातील वर्णव्यवस्था हे सर्वच अमानुष प्रवाह रुजू होते. समस्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातून उद्भवणारी अमानुष समाज व्यवस्था ही सारखीच भयंकर होती. निसर्गात असलेले प्रवाह उलथुन टाकायला निसर्ग स्वतः खंबीर असतो.मार्गात आलेले डोंगर-पर्वत पोखरुन पुढे जाण्याचे सामर्थ्य निसर्गाने नदीला

गेम ऑफ थ्रोन्स (HBO मालिका) - सर्वोतृष्ट दृश्ये. Game of Thrones (HBO series) Greatest scenes!

Spoiler Alert - GOT ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. ती सर्वानीच पाहिली असेल. तरीही ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी येथून पुढे वाचू नये असे मला वाटते. (GOT मधील एकूणएक दृश्य जबरदस्त आहे. त्यांतुन मला महत्त्वपूर्ण वाटणारे आणि आवडलेले दृश्ये, मी येथे सांगणार आहे. या दृश्यांना क्रमांक देणे अवघड आहे, म्हणून टाळले आहे!) Tyrion's Trial  हा सिन वरवर पाहता सर्वसाधारण वाटेल. पण GOT ची कथा ज्या काही सिन्सनी गुंफली आहे त्यातील हा एक सिन! सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट अभिनय यांनी तयार झालेला! "I am guilty of being a dwarf..." असं जेव्हा टिरियन म्हणतो तेव्हा अक्षरशः काटा येतो. पीटर डिंकलेजचा अभिनय इतका खरा वाटतो की त्याच्याशिवाय टिरियन हे पात्र अपूर्ण आहे असं वाटायला लागते. तो सध्याच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे यात शंकाच नाही! Massacre at The Hardhome मी गेम ऑफ थ्रोन्स बघायला सुरुवात केली तेव्हा मला वाटले पण नव्हते की जॉन स्नो सारखे पात्र हे पुढे मुख्य पात्रांपैकी एक असेल म्हणून. पण गेम ऑफ थ्रोन्स चा खरा नायक हाच हे मला कळाले ते या एपिसोडवरूनच! व्हाईट वॉकर पासून जी

सर्वोत्तम एकदिवसीय सामना!

क्रिकेट लोकप्रिय होण्यामागचं सर्वात मोठ कारण म्हणजे त्या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. "ये अनिश्चिताओं का खेल है।" यांवर माझा विश्वास आहे. म्हणून अगदी शेवटच्या चेंडू पर्यन्त सामना बघण्याचा उत्साह टिकून राहतो. केवळ वनडे आणि ट्वेंटी ट्वेंटी सामनेच नव्हे तर कसोटी सामने  शेवटच्या चेंडूपर्यंत जातात. एशेजचे बरेच सामने असे आहेत. पण कसोटीबद्दल नंतर कधीतरी. आज आपण वाचणार आहोत 'सर्वोत्तम एकदिवसीय सामन्या' बद्दल. सर्वोत्तम वनडे म्हंटलं तर आपल्याला आठवते २००२ ची नेटवेस्ट फाइनल, सा. आफ्रिकेनी पार केलेला ४३४ धावांचा डोंगर आणि अशे बरेच सामने. पण 'सर्वोत्तम एकदिवसीय सामना' म्हणून सर्वज्ञात आहे तो म्हणजे १९९९ च्या विश्वचषकाची उपांत्य फेरीचा आस्ट्रेलिया वि. द. आफ्रिकेचा सामना! या सामन्याची पार्श्वभूमी अशी की या वर्ल्ड कप मध्ये साउथ आफ्रिकेचा संघ त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळ करत होता. ते पहिल्यापासून "फेव्हरेट्स"म्हणुनच खेळत होते. त्यांचा लान्स क्लूसनर हा अष्टपैलू खेळाडू त्या वर्ल्ड कप चा "Man of the tournament" होता. आणि याउलट आस्ट्रेलिया चा संघ रडत खडत