'युध्दपट' म्हणजे युद्धावर किंवा युद्धाच्या पार्श्वभूमिवर आधारित चित्रपट. थोडक्यात युद्धपट म्हणजे 'वॉर ड्रामा' या जेनरचा(शैलीचा) चित्रपट असे आपण म्हणू शकतो. युद्धपट हा सत्य घटनेवर आधारित असू शकतो किंवा एखाद्या खऱ्या युद्धाची फक्त पार्श्वभूमि घेऊन काल्पनिक कथेवर आधारित असू शकतो. दुसऱ्या महायुद्धावर असे अनेक काल्पनिक कथानक असलेले चित्रपट येऊन गेले आहेत. केवळ महायुद्धच नव्हे तर 'अमेरिकन सिव्हिल वॉर', 'विएतनामी युद्ध' ते थेट 'ऐतिहासिक युद्धे' अशा सर्वच विषयांवर युद्धपट आहेत! जगभरातल्या विख्यात दिग्दर्शकांनी युद्धपट बनवलेले आहेत.
'द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई', 'फुल मेटल जॅकेट', 'सेव्हींंग प्रायवेट रायन', 'अपोकलिप्स नाउ' हे काही प्रसिद्ध युद्धपट. हे चित्रपट, प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांच्याही आवडीचे हे नव्याने सांगायला नको! 'इंग्लोरियस बास्टर्डस्' हा तारंटिनोचा चित्रपट केवळ जबरदस्त आहे. त्याचा हा (आणि प्रत्येक) चित्रपट पाहिल्यावर कळते किती अफाट आहे हा माणूस नाही! स्टैनले क्यूबरिक चा 'डॉ स्ट्रेंजलव्ह' हा शीत युद्धातील न्यूक्लिअर वॉर च्या तणावावर 'विनोदी' भाष्य करणारा एक वेगळा चित्रपट आहे. हा चित्रपट मस्ट वॉच आहे!
वॉर ड्रामा
'सेव्हींंग प्रायवेट रायन' हा अत्यंत उत्कृष्ट चित्रपट आहे. कुणाच्याही सर्वोत्तम दहाच्या यादीत सहज समाविष्ट होईल इतका उत्कृष्ट! ही कथा आहे आपलं काम संपवून लवकरात लवकर घरी जाण्याची इच्छा असलेल्या माणसांची. ते एका भयंकर युद्धात आहेत आणि 'प्रायवेट रायन' ला त्यातून वाचवणे हे त्यांचे अंतिम ध्येय्य आहे. हा चित्रपट नितांत सुंदर आहे. 'सुंदर' आणि युद्धपट? होय! हीच तर स्पिलबर्गची कमाल आहे! आणि टॉम हँक्स! या माणसावर कितीही लिहलें तरी कमीच. मी निष्ठुर आहे असं दाखवणारा कॅप्टन मिलर एकट्यात मात्र रडतो. त्यालाही घरी जायचंय पण रायनला घेऊनच. आपण केव्हा कॅप्टन मिलरशी भावनिक जोडले जातो कळत नाही! ही टॉम हँक्स आणि त्याच्या डोळ्यांंची कमाल आहे. टॉम हँक्स च्या आयुष्यातला हा सर्वोत्तम अभिनयांपैकी आहे. त्यावर्षी त्याला त्याचे तिसरे ऑस्कर का मिळाले नाही हा चर्चेचा विषय आहे.(सर्वोत्तम अभिनय डावलणे अकेडमीसाठी नवीन नाही!)
माझामते 'युद्धपट' या शब्दापेक्षा 'वॉर ड्रामा' हा शब्द या सिनेमाचं जास्त चांगल्या पद्धतीने वर्णन करतो. हा चित्रपट भयंकर युद्धाची भीषणता दाखवण्यात कुठेही कमी पडत नाही. पण हा सिनेमा युद्धात सहभागी असलेल्या व्यक्तिंंना आणि त्यांच्या भावनांना केंद्रस्थानी ठेवतो. शेवटी हे त्या-त्या चित्रपटाच्या पटकथेवर अवलंबून असते. बरेच 'युध्दपट' पाहिल्यावर आपण खरा युद्धपट पाहत आहोत असं वाटलं ते डंकर्क पाहिल्यावरच!
युद्धपट
जवळजवळ सर्वच दिग्गज दिग्दर्शकांनी युद्धपट बनवले आहेत. २०१७ मध्ये 'डंकर्क' प्रदर्शित झाल्यानंतर क्रिस्तोफर नोलान सुद्धा या यादीत समाविष्ट झाला. चित्रपटाचं नाव तो कशाबद्दल असणार आहे हे सूचित करत होते. पण तो 'नोलान' बनवनार म्हणून उत्सुकता शिगेला होती.
डंकर्क हा 'युद्धपट' आहे पण तो उर्वरित चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. नोलान ने येथेही आपल्या 'नॉन लीनियर स्टोरी टेलिंग' चा वापर केलाय. चित्रपट घडतो तो वेगवेगळ्या तीन टाईमलाइन्स 'द मोल'(एक आठवडा), 'द सी'(एक दिवस) आणि 'द एयर'(एक तास) मध्ये. चित्रपटाच्या शेवटी तीनही टाईमलाइन्स एकत्र होतात. नोलान चे चित्रपट हे एका पझल सारखे असतात. प्रेक्षकांना दृश्यांची संगत लाऊन ते पाहायचे असतात. 'डंकर्क' सुद्धा असाच आहे. प्रथमदर्शनी डंकर्क उथळ वाटतो, किंबहुना तो तसा वाटवा अशीच नोलानची इच्छा आहे का? पहिले अर्धा तास जे मुख्य पात्र आहे असं आपल्याला वाटतं त्याचा एकही संवाद नाही. शेकोटी भोवती गोल करून आपल्या आठवणी सांगणारे सैनिक आपल्याला दिसत नाहीत. दिसते ती फक्त त्यांची जगण्यासाठीची तळमळ! अगदी शेवटपर्यन्त प्रेक्षकांना बऱ्याच पात्रांंचे नाव देखील माहीत नसते. येथे युद्धाची परिस्तिथि खरोखर कशी असते हे नोलान सांगतोय. डंकर्क वर अडकलेले इंग्लैंड चे सैनिक ही इंग्लैंड वर ओढावलेली पराभवाची सावली होती. त्या सैनिकांची सुटका हा विजय नव्हता मात्र ती विजयाची नवी उमेद होती 'Survival is Victory' मधून नोलान आपल्याला हेच सांगतोय! चित्रपटाच्या शेवटी बचावलेले सैनिक जेव्हा रेल्वेच्या खिडकीतुन बाहेर पाहतात तेव्हा त्यांना त्यांचे स्वागत करत असलेले नागरिक दिसतात. त्यातील एक सैनिक चर्चिलच्या भाषणाची बातमी वाचतोय आणि चित्रपट संपतो. हा सिन चित्रपटातला सर्वोत्कृष्ट सिन आहे असं मला वाटतं!
डंकर्कच्या बाबतीत विशेष उल्लेख करावा तो हँस झिमरच्या पार्श्वसंगीताचा आणि सिनेमाटोग्राफीचा!
अशाप्रकारे डंकर्क हा एक 'युद्धपट' आहे!
काही मस्ट वॉच युद्धपट
- Saving Private Ryan (Steven Spielberg)
- Inglorious Bastard (Quinton Tarantino)
- Apocalyps Now (Francis Ford Coppola)
- Full Metal Jacket (Stanley Kubrick)
- The Bridge on the River Qwai
- Dr Strangelove (Stanley Kubrick)
- American Sniper (Clint Eastwood)
- No Mans Land (Bosnian Film)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा