मुख्य सामग्रीवर वगळा

सर्वोत्तम एकदिवसीय सामना!


क्रिकेट लोकप्रिय होण्यामागचं सर्वात मोठ कारण म्हणजे त्या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. "ये अनिश्चिताओं का खेल है।" यांवर माझा विश्वास आहे. म्हणून अगदी शेवटच्या चेंडू पर्यन्त सामना बघण्याचा उत्साह टिकून राहतो. केवळ वनडे आणि ट्वेंटी ट्वेंटी सामनेच नव्हे तर कसोटी सामने  शेवटच्या चेंडूपर्यंत जातात. एशेजचे बरेच सामने असे आहेत. पण कसोटीबद्दल नंतर कधीतरी. आज आपण वाचणार आहोत 'सर्वोत्तम एकदिवसीय सामन्या' बद्दल. सर्वोत्तम वनडे म्हंटलं तर आपल्याला आठवते २००२ ची नेटवेस्ट फाइनल, सा. आफ्रिकेनी पार केलेला ४३४ धावांचा डोंगर आणि अशे बरेच सामने. पण 'सर्वोत्तम एकदिवसीय सामना' म्हणून सर्वज्ञात आहे तो म्हणजे १९९९ च्या विश्वचषकाची उपांत्य फेरीचा आस्ट्रेलिया वि. द. आफ्रिकेचा सामना!


या सामन्याची पार्श्वभूमी अशी की या वर्ल्ड कप मध्ये साउथ आफ्रिकेचा संघ त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळ करत होता. ते पहिल्यापासून "फेव्हरेट्स"म्हणुनच खेळत होते. त्यांचा लान्स क्लूसनर हा अष्टपैलू खेळाडू त्या वर्ल्ड कप चा "Man of the tournament" होता. आणि याउलट आस्ट्रेलिया चा संघ रडत खडत super six पर्यंत पोहचला होता. super six चा शेवटचा सामना ह्याच दोन संघात झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आफ्रिकेने २७२ धावांचं लक्ष औस्ट्रेलिया ला दिले होते. त्याचा पाठलाग करताना एकवेळ ५४/४ अशी स्तिथि आस्ट्रेलिया ची झाली आणि त्याच वेळेस हर्शल गिब्ब्स ने मिड विकेट वर "स्टीव्ह वाँ" चा झेल सोडला! आणि स्टीव्ह वाँ त्याच्या आस्ट्रेलियन शैलीत गिब्ब्स ला म्हणाला "You have dropped the world cup!" पुढे वाँ ने नाबाद १२० धावा काढत आस्ट्रेलिया ला उपांत्य फेरीत प्रवेश करून दिला. योगायोग बघा, उपांत्य फेरिचा सामना देखिल ह्याच दोन संघांमध्ये झाला. तो हाच सामना "सर्वोत्तम एकदिवसीय सामना!" 

उपांत्य फेरीत आस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २१३ धावा केल्या. लक्ष लहान असले तरी समोर "Player of the century" शेन वाँर्न गोलंदाजी करत असेल तर ते लक्ष पार करणे भयंकर अवघड असते! झालेही तसेच वाँर्ने चालला. त्याने ४ विकेट्स घेतल्या आणि कमी धावा असणारा सामना शेवटच्या षटकात जाउन पोहोचला. आफ्रिकेचा पूर्ण मालिकेतला सर्वोत्तम खेळाडू लान्स क्लूस्नर खेळत होता. दुसऱ्या बाजुला अलन डोनाल्ड होता. फ्लेमिंग ने पहिला चेंडू टाकला आणि फ़ॉर्मात असलेल्या क्लूसनर ने चौका मारला. दुसर्या चेंडूला पॉल रायफल ने बाउंड्री जवळ क्लूसनर चा अवघड झेल सोडला. परत चौकार. आता चित्र जरासं स्पष्ट झालं होतं. १ धाव आणि दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम सामन खेळेल असे सर्वाना वाटत होते! पण अजुन ४ चेंडू बाकी होते.सामना बाकी होता! तीसरा चेंडू रिकामा गेल्यावर तणाव आफ्रिकेवर होता. क्लूसनर ला ठाउक होते, सामना आपल्या हातात आहे. पण "टेल हँडर" असलेल्या डोनाल्ड ला तणाव पचला नाही आणि चौथा चेंडू क्लूसनर च्या बैटला लागताच तो पळाला! क्लूसनर ला काही कळायच्या आतच क्षेत्र रक्षणात आक्रामक असणाऱ्या आस्ट्रेलियाच्या संघाने डोनाल्ड ला पायचीत केले! सामना अनिर्णीत राहिला परंतु super six मध्ये आस्ट्रेलिया चे गुण आफ्रिकेपेक्षा जास्त असल्यामुळे त्याना अंतिम सामन्यात जागा मिळाली आणि पुढे काय झाले हे आख्या क्रिकेट विश्वाने पाहिले, आस्ट्रेलिया ने तब्बल १० वर्षे क्रिकेट जगतावर राज्य केले. स्टीव्ह वाँ चे शब्द खरे ठरले होते! गिब्स ने झेल नव्हता सोडला तर विश्वचषकच सोडला होता कारण तोच सामना जिंकल्यामुळे super six मध्ये आस्ट्रेलिया आफ्रिकेपेक्षा वरच्या स्थानात होती! परत एकदा सिद्ध झाल होत की क्रिकेट मध्ये शेवटच्या क्षणा पर्यन्त काय होईल हे कुणीच नाही सांगू शकत!

तुम्ही पाहिलेला सर्वोत्तम एकदिवसीय सामना कोणता? कमेंट करा!

टिप्पण्या