मी लहानपणापासूनच क्रिकेट चाहत्यांकडून सर्वोत्तम एकदिवसीय सामान्याविषयी ऐकले होते. १९९९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपची सेमिफायनल- 'ऑस्ट्रेलिया वि. साऊथ आफ्रिका' म्हणजे आतापर्यंत खेळला गेलेला सर्वांत रोमांचक सामना. त्या सामन्याच्या चर्चा आजही लोक करतात. ह्या सामन्याच्या वेळी मी लहान होतो, त्यामुळे हा सामना मी पाहिला तो त्या सामन्याचा रिपीट टेलिकास्टच. पण त्या मॅचचा रोमांच किंचितही कमी झालेला नव्हता. आजही ती मॅच लागली की मी एकटक पाहतो, इतका जबरदस्त तो मुकाबला होता. थोडक्यात काय तर हा सामना क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झालाय. (या सामन्यावर आपल्या ब्लॉगवर एक लेख सुद्धा आहे. जरूर वाचा!) पण क्रिकेट चाहता असल्यामुळे माझ्या मनात एक खंत होती असा सामना आपल्याला लाईव्ह पाहायला नाही मिळाला. परत कधी असा सामना होईल हे मला वाटलं नव्हतं, पण इच्छा नक्की होती. आणि असा सामना याची देही याची डोळा पाहायला मिळाला, आम्हा क्रिकेट चाहत्यांना जणू देवच पावला.
२०१९ चे क्रिकेट विश्वचषक हे खूप गाजले. बऱ्याच दिग्गज खेळाडूंचे हे शेवटचे विश्वचषक असणार होते. इंग्लंडच्या पावसाने बरेच सामने रद्द करून क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड केला हे तर वेगळेच! अशाच रद्द झालेल्या सामन्यांपैकी एक होता भारत वि. न्यूजिलँड चा साखळी सामना. या सामन्यावेळी कोणालाही वाटले नव्हते की दोन सेमिफायनल्स पैकी एक सेमिफायनल याच दोन संघामध्ये होईल म्हणून. कारण न्यूजिलँड चा संघ प्रत्येक वेळ सारखा अनपेक्षितपणे सेमिफायनल मध्ये येऊन बसला. न्यूजिलँड चा संघ कोणालाही कधीही आणि कुठेही हरवू शकतो असा कधीच नव्हता. ते फेव्हरेट्स म्हणून कधी खेळलेच नाहीत. (अपवाद १९९२ आणि २०१५) पण तरीही आयसीसीच्या स्पर्धांमध्ये त्यांचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. २०१९ ची त्यांची वाटचाल अशीच अनपेक्षित होती. ते 'भारताला' हरवून फायनल मध्ये जातील हे तर सोडाच ते सेमिफायनलला येतील हे सुद्धा कोणाला वाटले नसेल! याऊलट भारतीय संघ प्रत्येक वर्ल्ड कप खेळतो तो फेव्हरेट्स म्हणूनच! त्यामुळे भारत सेमिफायनल मध्ये येऊन न्यूजिलँड सारख्या संघाकडून हरेल हे जास्त अनपेक्षित होते. भारत का हरला यावर बरीच चर्चा झाली. भारत हरल्यावर मला सुनील गावस्कर यांनी एका कार्यक्रमात सांगितलेला किस्सा आठवला. तो असा - 1983 च्या Ind vs Eng सेमीफायनल बद्दल बोलताना सुनील गावस्कर म्हणाले होतेे
"No one was talking about Ind vs Eng SF, all were already started talking about Eng vs WI final"
म्हणजे कोणाला विश्वासच नव्हता भारत जिंकेल म्हणून! त्या दिवशी न्यूजिलँड विरुद्ध सुद्धा तेच झाले, फायनल भारत वि. इंग्लंड होणार की भारत वि. ऑस्ट्रेलिया यातच सर्व मग्न होते.... आणि NZ जिंकली सुद्धा!
क्रिकेटमध्ये वेळोवेळी असे क्षण येतात की प्रेक्षक ते कधीच विसरू शकत नाही. धोनीने वानखेडेवर मारलेला विश्वविजयी षटकार कोणी विसरेल का? आणि तेवढाच लक्षात राहील न्यूजिलँड विरुद्धच्या सेमिफायनलमधील त्याचा रन आऊट. भारतीय प्रेक्षकांच्या अगदी जिव्हारी लागलेला हा रन आऊट गुपटिल च्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना होता!
(हा या ऐतिहासिक सामन्यावरील भाग १ आहे. संपूर्ण लेख दोन भागात आहे.)
(हा या ऐतिहासिक सामन्यावरील भाग १ आहे. संपूर्ण लेख दोन भागात आहे.)
खूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद राहुल जी 🙏
हटवा