Spoiler Alert - GOT ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. ती सर्वानीच पाहिली असेल. तरीही ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी येथून पुढे वाचू नये असे मला वाटते.
(GOT मधील एकूणएक दृश्य जबरदस्त आहे. त्यांतुन मला महत्त्वपूर्ण वाटणारे आणि आवडलेले दृश्ये, मी येथे सांगणार आहे. या दृश्यांना क्रमांक देणे अवघड आहे, म्हणून टाळले आहे!)
Tyrion's Trial
हा सिन वरवर पाहता सर्वसाधारण वाटेल. पण GOT ची कथा ज्या काही सिन्सनी गुंफली आहे त्यातील हा एक सिन! सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट अभिनय यांनी तयार झालेला! "I am guilty of being a dwarf..." असं जेव्हा टिरियन म्हणतो तेव्हा अक्षरशः काटा येतो. पीटर डिंकलेजचा अभिनय इतका खरा वाटतो की त्याच्याशिवाय टिरियन हे पात्र अपूर्ण आहे असं वाटायला लागते. तो सध्याच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे यात शंकाच नाही!
Massacre at The Hardhome
मी गेम ऑफ थ्रोन्स बघायला सुरुवात केली तेव्हा मला वाटले पण नव्हते की जॉन स्नो सारखे पात्र हे पुढे मुख्य पात्रांपैकी एक असेल म्हणून. पण गेम ऑफ थ्रोन्स चा खरा नायक हाच हे मला कळाले ते या एपिसोडवरूनच! व्हाईट वॉकर पासून जीव वाचवून पळता पळता जॉन ला त्याची लॉंग क्लॉ सापडते आणि तो त्या व्हाईट वॉकर चा वार अडवतच नाही तर त्याला मारतो सुद्धा. तेथे स्वतः जॉन ला आणि प्रेक्षकांना सुद्धा समजते.. 'he is no ordinary man!'
King in the North
'किंग इन दी नॉर्थ' असे दोन सीन्स आहेत. एक रॉब स्टार्क चा आणि एक जॉन चा. मला आवडलेला साहजिकच जॉन स्नो चा किंग इन द नॉर्थ म्हणून झालेला राज्याभिषेक. हा ऑन स्क्रीन झालेला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट राज्याभिषेक आहे यात शंकाच नाही. बास्टर्ड म्हणून हिनवले गेलेल्या 'स्नो' ला सर्वजण एक राजा म्हणून स्वीकार करतात, हे जॉन ने कमावले. हा सिन खरंच अंगावर शहारा आणणारा आणि तेवढेच समाधान देणारा सुद्धा आहे!!!
Chaos is a ladder.
सातव्या पर्वात जेव्हा लिटल फिंगर मेला तेव्हा मला ते मनापासून आवडलेलं नव्हतं. ती फक्त एक फॅन सर्व्हिस होती किंवा मालिका लवकर संपवण्यासाठी केलेली तडजोड, इतके हे पात्र मला भावते. शेवटी एव्हढे मोठे 'गेम ऑफ थ्रोन्स' घडवून आणण्यामध्ये पीटर बेलीश चा खूप वाटा आहे.
बेलीश आयर्न थ्रोन कडे टक लावून बघत असतो. आणि मागून येतो वॅरिस. त्यानंतर दोघांमध्ये जे काही संभाषण होते.. त्याला मी "exchange of philosophies" म्हणेल. हे संभाषण आणि बेलीश चा "chaos is ladder" हा क्योट संपूर्ण got चे सार आहे. एकदा आपल्या आसपासच्या राजकीय परिस्थितीवर नजर टाका. "Chaos.." हे फक्त got पुरतेच मर्यादित नाही हे आपल्या लक्षात येईल!!!
गेम ऑफ थ्रोन्स मधील तुमचे आवडते दृश्य कोणते ?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा