'युध्दपट' म्हणजे युद्धावर किंवा युद्धाच्या पार्श्वभूमिवर आधारित चित्रपट. थोडक्यात युद्धपट म्हणजे 'वॉर ड्रामा' या जेनरचा(शैलीचा) चित्रपट असे आपण म्हणू शकतो. युद्धपट हा सत्य घटनेवर आधारित असू शकतो किंवा एखाद्या खऱ्या युद्धाची फक्त पार्श्वभूमि घेऊन काल्पनिक कथेवर आधारित असू शकतो. दुसऱ्या महायुद्धावर असे अनेक काल्पनिक कथानक असलेले चित्रपट येऊन गेले आहेत. केवळ महायुद्धच नव्हे तर 'अमेरिकन सिव्हिल वॉर', 'विएतनामी युद्ध' ते थेट 'ऐतिहासिक युद्धे' अशा सर्वच विषयांवर युद्धपट आहेत! जगभरातल्या विख्यात दिग्दर्शकांनी युद्धपट बनवलेले आहेत. 'द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई', 'फुल मेटल जॅकेट', 'सेव्हींंग प्रायवेट रायन', 'अपोकलिप्स नाउ' हे काही प्रसिद्ध युद्धपट. हे चित्रपट, प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांच्याही आवडीचे हे नव्याने सांगायला नको! 'इंग्लोरियस बास्टर्डस्' हा तारंटिनोचा चित्रपट केवळ जबरदस्त आहे. त्याचा हा (आणि प्रत्येक) चित्रपट पाहिल्यावर कळते किती अफाट आहे हा माणूस नाही! स्टैनले क्यूबरिक चा 'डॉ स्ट्रेंजलव्ह...
हा ब्लॉग खेळ, सिनेमा आणि अन्य वेगवेगळ्या विषयांवर आहे.