2014 च्या लोकसभा निवडणुकांनी भारतीय राजकारण कायमचेच बदलून टाकले. एक विचारसरणीकडून राजकीय दृष्ट्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या गोष्टी मुख्य प्रावाहात आल्या. सेक्युलॅरिसम् ची जागा आता नॅशनॅलिसम् ने घेतली आहे. 'वोट बँकेचे' राजकारण हळूहळू लोप पावत चालले आहे. याबरोबर आणखीन बऱ्याच गोष्टी बदलल्या. मग लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला म्हणतात तो मीडिया बदलणार नाही कशावरून? 2014 नंतर देशातील मीडियाचे सरळ दोन गटच तयार झाले. एका गटाने उजवा हात पकडला तर दुसरा गट जो आधीच डावीकडे होता, असे मीडियाचे विभाजन झाले. पण आजही सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांवर वर्चस्व आहे ते डाव्या गटाचेच. उजवा गट कधी अस्तित्वातच नव्हता असं नाही, पण मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचणे त्यांना जमले नाही. (की जमू दिले नाही?) 2014 नंतर मात्र तथाकथित 'मेनस्ट्रीम' माध्यमांमध्ये असा 'उजवा' गट तयार झाला. शिवाय सोशल मीडिया हे सर्वच विचारांच्या लोकांना खुले असल्यामुळे येथेही बरेच डावे विरोधी पत्रकार, वेब पोर्टल्स तयार झाले. यामुळे पत्रकारितेचा ठेका घेतलेल्यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार हे नक्की होते. आतापर्यंत आम...
हा ब्लॉग खेळ, सिनेमा आणि अन्य वेगवेगळ्या विषयांवर आहे.